Ravet Police Station | देहुरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन रावेत पोलीस स्टेशनच्या निर्मितीस शासनाची मंजुरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate) अंतर्गत देहुरोड पोलीस ठाण्याचे (Dehurod Police Station) विभाजन करुन रावेत पोलीस चौकीचे रुपांतर पोलीस स्टेशनमध्ये (Ravet Police Station) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रावेत पोलीस स्टेशनच्या मंजुरीचा शासन आदेश आज गृह विभागाने जारी केला आहे. तसेच रावेत पोलीस स्टेशनला (Ravet Police Station) मुष्यबळ उपलब्ध करुन देण्यास आणि त्याच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे.

पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रांतर्गत देहुरोड पोलीस स्टेशनचे विभाजन करुन रावेत पोलीस चौकीचे रुपांतर नवीन रावेत पोलीस स्टेशनमध्ये करण्याचा प्रस्ताव (Proposal) सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला गृह विभागाने मान्यता दिली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या रावेत पोलीस स्टेशन साठी पोलीस निरीक्षक (PI) 1,
सहायक पोलीस निरीक्षक (API) 1, पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3, सहायक पोलीस उपनिरीक्षक 3,
पोलीस हवालदार 9, पोलीस नाईक 18, पोलीस शिपाई 36 असे एकूण 71 पोलीस अधिकारी आणि कमचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

सध्य:स्थितीत रावेत पोलीस चौकीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक 1, पोलीस उपनिरीक्षक 1,
सहायक पोलीस उप निरीक्षक 2, पोलीस हवालदार 4, पोलीस नाईक 4, पोलीस शिपाई 19 असे एकूण 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
उर्वरीत 40 पदे उपलब्ध करुन देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
नव्याने सुरु होत असलेल्या रावेत पोलीस स्टेशनच्या 15 लाख 54 हजार 500 रुपयांच्या खर्चाला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.

तसेच पोलीस ठाण्याची हद्द निश्चित करुन त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
रावेत पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कर्यक्षेत्रात आणखी एका पोलीस ठाण्याची भर पडली आहे.
रावेत पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Web Title : Ravet Police Station | Government approves creation of Ravet police station by dividing Dehurod police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update