Ravet Pune Crime News | बाहेरुन कॉफी शॉप आत अश्लिल चाळे करण्यासाठी केली होती सोय, तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी : Ravet Pune Crime News | बाहेरुन खाद्य पदार्थ, कॉफी मिळण्याचे ठिकाण दिसत होते, पण तेथे नेहमीपेक्षा तरुण तरुणीची गर्दी अधिक असायचे. पोलिसांना याची कुणकुण लागली. त्यांनी त्यावर छापा घातला. तेव्हा बाहेरुन कॉफी शॉप असलेली ही जागा प्रत्यक्षात पार्टिशिन लावून तरुणतरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी उपलब्ध करुन दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Ravet Pune Crime News)
याबाबत पोलीस हवालदार सुधा टोके यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश अजिनाथ जाधव Mahesh Ajinath Jadhav (वय २७, रा. पंचवटी सोसायटी, रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील डी वाय पाटील रोडला यु अँड मी कॅफे (U & Me Cafe in Ravet) आहे. या कॅफेला कोणताही परवाना नाही. महेश जाधव याने कॉफी शॉपचा बोर्ड लावून खाद्य पदार्थ विक्री करीत असल्याचे दाखविले होते. प्रत्यक्षात कॉफी शॉपच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये ३ बाय ३ लांबी रुंदीचे प्लायवूडचे व सुमारे ५ फुट उंचीचे ८ कप्पे केले होते. त्याला अनुक्रमे १ ते ८ क्रमांक दिलेले होते.
त्यास बाहेरचे बाजूने पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवून तरुण तरुणींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे व
बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस डी कोळगे तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा