‘दादासाहेब फाळके अवॉर्ड 2020’ होस्ट करणार ‘हा’ अभिनेता, 20 फेब्रुवारीला सोहळ्याचं आयोजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीच्या जगात असे अनेक अ‍ॅक्टर्स आहेत ज्यांना शो होस्ट करायला खूप आवडतं. काहीजण यात आपली छाप सोडत असतात. अ‍ॅक्टींग आणि अँकरींगनं लोकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे रवी दुबे याचं.

https://www.instagram.com/p/B8q6F8OpnUY/?utm_source=ig_embed

रवी दुबे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2020 हा पुरस्कार सोहळा होस्ट करणार आहे. याबाबत बोलताना रवी म्हणाला, “प्रतिष्ठीत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2020 हा सोहळा होस्ट करण्यची संधी मिळणं माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. हे केवळ भारतीय फिल्म उद्योग अस्तित्वाचा गौरवच नाही करत हे त्यांचा वाढदिवसही साजरा करतं.”

https://www.instagram.com/p/B8fu2CgJHZU/?utm_source=ig_embed

पुढे रवी दुबे म्हणतो, “मला असं वाटतं की हा केवळ एक पुरस्कार समारंभच नाही तर दादासाहेब फाळकेजींच्या प्रति कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आज त्यांच्यामुळे इंडस्ट्रीत आपली भरभराट आहे. मी या प्रतिष्ठीत सायंकाळची भव्यता आणि सन्मान कायम ठेवण्याचा शक्य तो प्रत्येक प्रयत्न करेन.” रवीनं इंनटाग्रामवरून एक पोस्टही शेअर केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.”