Ravi Rana | रवी राणा यांच्या घरी पोलीस वॉरंट घेऊन दाखल, घडामोडींना वेग

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती न्यायालयाने अमरावतीचे आमदार (Amravati MLA) रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट (Bail Warrant) जारी केला आहे. अमरावती पोलीस (Amravati Police) हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणा यांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी आले होते. परंतु रवी राणांच्या (Ravi Rana) घरात कोणी नसल्याने हे वॉरंट स्विकारले नाही. त्यामुळे रवी राणांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर हे वॉरंट बजावण्यात आल्याने भाजपला (BJP) मोठा धक्का बसू शकतो.

 

अमरावती पोलिसांनी खार पोलिसांच्या (Khar Police) मदतीने हे वॉरंट घेऊन रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरी गेले. मात्र, त्यावेळी रवी राणा किंवा खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) हे घरी नव्हते. त्यामुळे पोलीस वॉरंट न देताच परतले. रवी राणा यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpeth Police Station) दाखल गुन्ह्यांच्या तारखेला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने हे वॉरंट काढल्याची माहिती आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार,अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन आयुक्तांवर शाई फेक केल्या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर हत्येचा प्रयत्नचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या रागातून अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Amravati Municipal Commissioner Dr. Praveen Ashtikar)
यांच्यावर शाई फेक केली होती. या प्रकरणात हायकोर्टाचे (High Court) वॉरंट निघाले आहे.
त्यामुळे राजापेठ पोलिसांचे (Rajapeth Police) पथक आणि मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पथक रवी राणा यांच्या मुंबईतील घरी पोहचले आहेत.

 

Web Title :- Ravi Rana | amravati police reached mla ravi ranas mumbai house with warrant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले – ‘मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल’

 

Pune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार, खून करणाऱ्या तिघांना अटक

 

Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात