Ravi Rana | ‘उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – रवी राणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (V. D. Savarkar) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांवर भाष्य केल्यापासून काँग्रेसेत्तर पक्ष त्यांच्यावर आक्रमक झाले आहे. त्यावर आता अमरावतीचे अपक्ष आणि भाजप (BJP) समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे.

वीर सावरकरांनी देशावर अतोनात प्रेम केले. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रभावी सहभाग घेतला होता. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण केले. त्यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे ते देशाचे श्रद्धास्थान आहेत. पण, काँग्रेस खासदार राहुल गांधी देशविरोधी वक्तव्य करतात. आणि त्यांचे समर्थन उद्धव ठाकरे करतात. त्यामुळे या दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी थोड्याश्या पाण्यात जीव दिला पाहिजे. कारण ते सावरकरांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला राहुल गांधी यांचे समर्थन करत आहेत. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राणा यांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी हिंगोलीच्या सभेत सावरकरांविषयी भाष्य केले होते.
सावरकर यांनी अंदमानात तुरुंगात असताना, इंग्रजांना माफिनामे लिहून देत, स्वत:ची सुटका केली होती.
त्यांनी इंग्रजांचे काम केले होते. अंदमानातून सुटून आल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात ब्र काढला नव्हता.
त्यांना इंग्रज दरमहा पेनश्न देत होते. त्यामुळे ते वीर नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते.

Web Title :- Ravi Rana | ‘File sedition case against Uddhav Thackeray and Rahul Gandhi’ – Ravi Rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rishi Sunak | ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांचे मोठे निर्णय

Mumbai Railway Megablock | लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी; मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक

Pune Crime | अंबामातेची चांदीची मुर्ती, हार, निरांजन आणि दागिने चोरणाऱ्या मोलकरीणीला कोरेगाव पोलिसांकडून अटक