Ravi Rana | ‘उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही…’; रवि राणांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात वाद सुरु झाला आहे. हा वाद आत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दारात पोहचला आहे. 8 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंचे उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असल्याचा आरोप रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

 

90 टक्के शिवसेनेचे नेते शिंदेंसोबत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये खऱ्या शिवसैनिकाचे विचार दिसून येतात. 90 टक्के शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत आहे. बहुमत असल्याने शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण (Dhanushya Ban Symbol) हे शिंदे यांच्याकडेच जाणार. एवढंच नाही तर चिन्हासोबत शिवसेना भवनही एकनाथ शिंदे यांना मिळेल, असा विश्वास रवी राणा (Ravi Rana) यांनी बोलून दाखवला.

 

उद्धव ठाकरेंना बुडवण्याचे श्रेय राऊतांना
संजय राऊतांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मुलाखत (Interview) घेतली आहे.
लवकरच ही मुलाखत प्रकाशित केली जाईल. यानंतर अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे जनतेसमोर येत नव्हते त्या त्या वेळेस संजय राऊत ठाकरेंची मुलाखत घेत होते आणि ती प्रकाशित करत होते.
संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांचे म्हणणे ऐकतात.
त्यामुळे उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवण्याचं श्रेय संजय राऊतांना जाते, असाही आरोप राणांनी केला.

 

Web Title :- Ravi Rana | MLA ravi rana allegations on shiv sena leader mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Smriti Irani | ‘बार’वरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

 

Sandipan Bhumare | ‘शहाणपणा करु नको, तू ये मग दाखवतो’ ! संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची Audio Clip व्हायरल

 

MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले Jio-Airtel-Vi!