Ravi Rana | मी बच्चू कडूंची माफी मागतो, ‘त्या’ वादावर रवी राणा म्हणाले ‘पण बच्चू कडूंनी..’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या वादावर आता पडदा पडला आहे. रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही काळ हा वाद आता शांत झाला आहे.

मागील अनेक दिवस हा वाद सुरु होता. त्यांच्या या वादात राज्यातील राजकारण तापले होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी केली आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यासोबत चर्चा केली. बंद दाराआड रवी राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आणि रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. बोलण्याच्या ओघात मी जास्त बोलून गेलो. माझ्याकडून काही शब्द गेले, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. माझ्या बोलण्यामुळे बच्चू कडू आणि अन्य कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी जाहीर माफी मागतो, असे रवी राणा म्हणाले.

बच्चू कडू यांची मी माफी मागतो. पण त्यांची देखील काही विधाने माझ्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे माझा तोल गेला. त्यामुळे कडूंनी देखील आपले विधान मागे घ्यावे, असे राणा म्हणाले.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कडू गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी आहेत.
त्यामुळे त्यांनी 50 कोटी घेतले होते आणि त्याचमुळे त्यांनी शिंदे यांना पाठिंबा देखील दिला होता,
असे राणा म्हणाले होते. त्यावर कडू यांनी संताप व्यक्त केला होता. राणा यांच्या आरोपात काही तथ्य नाही.
त्यांनी केवळ आरोप करु नये, पुरावे द्यावे. नाहीतर आम्ही 8 ते 10 आमदार वेगळी भूमिका घेऊ असे त्यांनी
पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. राणा यांनी केलेल्या आरोपामुळे केवळ मीच नाही तर अन्य आमदार देखील संकटात आले
आहेत. राणांच्या आरोपात गुवाहाटीला बंडात सामील असलेल्या सर्व आमदार आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे
जनता वेगळ्या नजरेने पाहू लागली आहे, असे कडू म्हणाले होते.

Web Title :- Ravi Rana | ravi rana on bacchu kadu devendra fadnavis eknath shinde prahar bjp balasahebanchi shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा