Ravi Rana | “५० खोक्यांचा ‘कडु’ वाद गोड होऊन मिटेल, जेव्हा २५ खोक्यांचा वाटा ‘राणा’ साहेबांना भेटेल..!”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात मागील अनेक दिवस मोठा वाद सुरु होता. तो अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने मिटला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्वीट करत भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करत रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर टोला लावला आहे.

 

“५० खोक्यांचा ‘कडु’ वाद गोड होऊन मिटेल, २५ खोक्यांचा वाटा जेव्हा ‘राणा’ साहेबांना भेटेल..!” असे ट्वीट रविकांत वरपे यांनी केले आहे. यातून ते बच्चू कडू यांना 50 कोटी रुपये मिळाले होते, असे सूचवतात. तसेच त्यातील 25 कोटी जेव्हा रवी राणा यांना मिळतील, तेव्हाच हा वाद मिटेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

 

 

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन 50 कोटी घेतले आहेत. तसेच कडू तोडपाणी करतात, ते पैसे घेऊन लोकांना पाठिंबा देतात, असे देखील राणा म्हणाले होते. त्यावर बच्चू कडू संतापून उठले होते. त्यांनी राणा यांना पुरावे देण्याचे आव्हान केले होते. तसेच 1 नोव्हेंबरपर्यंत राणांनी पुरावे न दिल्यास आपण 10 आमदारांसोबत वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी दोघांना बैठकीत बोलवत शांततेत कामे करण्याचा सल्ला दिला होता.
तसेच दोघांनीही एकमेकांवर रागाच्या भरात आरोप केल्याने माफी मागायला सांगितली होती.
त्यानुसार राणांनी कडूंची माफी मागितली होती. त्यांच्या वादावर आता पडदा पडला आहे.

 

Web Title :- Ravi Rana | ravi rana vs bacchu kadu meeting fadnavis apologizes bacchu kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrapur ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना सार्वजनिक बंधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे मिशन 40! शिंदे गटाच्या आमदारांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात