Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – उमेश कोल्हे हत्याप्रकरण शांत करण्यासाठी आणि दाबण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना फोन केला होता, असा खळबळजनक दावा आणि गंभीर आरोप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विधानसभेत केला. कोल्हेच्या हत्येचे प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून पोलिसांना फोन केला होता, असा आरोप राणांनी केला आहे. तसेच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या देशेने नेण्यात उद्धव ठाकरे सरकारचा हात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी राणा (Ravi Rana) यांनी केली.

राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रश्नावर सरकारच्या वतीने उत्तर दिले. उमेश कोल्हे हत्याप्रकरणाच्या चौकशीमध्ये आजवर काय घडले याचा विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल. तसेच रवी राणा यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे खरोखरच जर या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यासाठी दबाव आणण्यात आला का? पोलिसांना कोणी फोन केले? याचा मुद्देसूद अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल. तो अहवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, आणि योग्य ती कार्यवाही होईल, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.

उमेश कोल्हे हे उजव्या विचारांचे हिंदुत्वादी कार्यकर्ते होते.
त्यांनी नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपणीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारीत
केली होती. त्यातून त्यांची हत्या झाली होती. पण या प्रकरणाचा तपास महिनाभर चोरीच्या गुन्ह्याखाली केला गेला.
यासाठी काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता.
उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबवण्याचा प्रयत्न देखील ठाकरेंनी केला.
ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही खासदार नवनीत राणा आणि मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना
भेटलो आणि प्रकरणाची दाहकता त्यांना सांगितली.
यामुळे आता तत्कालीन सरकारची आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे,
अशी मागणी राणा यांनी केली.

Web Title :- Ravi Rana | uddhav thackeray call to suppress umesh kolhe murder case ravi rana allegation shambhuraj desai ordered an inquiry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | …त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत – रोहित पवार

Jayant Patil Suspension | जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांचा अजित पवारांना फोन (व्हिडिओ)

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसमधून करायची असेल कमाई तर अशी करा गुंतवणूक, भासणार नाही पैशांची अडचण