राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून 90 लाखांचे फंडिंग, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दावा करत म्हटले की, चीनने राजीव गांधी फाउंडेशनला अर्थसहाय्य केले आहे. काँग्रेसने सांगावे कि, हे प्रेम कसे वाढले. त्यांच्या कार्यकाळात चीनने आपल्या भूमीवर कब्जा केला. एका कायद्यात अंर्तगत कोणताही पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. त्यामुळे या देणगीसाठी सरकारची परवानगी घेतली होती की नाही ? हे कॉंग्रेसने स्पष्ट करावे. त्यांनी म्हंटले की, राजीव गांधी फाउंडेशनसाठी 2005-06 ची देणगीदारांची यादी आहे. यात चीनच्या दूतावासाने डोनेशन दिले असे स्पष्ट दिसत आहे. असे का झाले? काय गरज होती? त्यात अनेक उद्योगपती, पीएसयू यांचीही नावे आहेत. एवढे पुरेसे नव्हते का कि चीन दूतावासातूनही लाच घ्यावी लागली. चीनकडून फाऊंडेशनला 90 लाखांचा निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, हे सर्व विचारपूर्वक घडवले होते का ? ज्यानंतर कॉंग्रेस सरकारमध्ये भारत आणि चीनमधील व्यापार तूट 33 पट वाढली होती. पक्षाशी केल्या जाणाऱ्या सामंजस्य कराराबाबत काँग्रेसने खुलासा करावा. चिनी दूतावास राजीव गांधी फाउंडेशनला अर्थसहाय्य देत आहे. आपण भारत आणि चीन दरम्यान मुक्त व्यापाराबद्दल बोलत आहात. ते म्हणाले की, एकेकाळी कॉंग्रेसच्या राजवटीत चीनने आपल्या देशाचा एवढा मोठा भूभाग ताब्यात घेतला. दहा वर्षांच्या राजवटीत कॉंग्रेसचे लोक चीनसमोर गुडघे टेकत होते. म्हणून जेव्हा जेव्हा चीनबद्दल प्रश्न उपस्थित झाले, तेव्हा त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रभावी उत्तरे दिली नाहीत.

कायदामंत्र्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित करत म्हंटले की, फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेटरी अ‍ॅक्ट 1976 च्या कलम चार, पाच, सहा आणि तेवीस मध्ये म्हटल्यानुसार कोणताही उमेदवार परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. कोणतीही राजकीय प्रकारची संस्था सरकारच्या परवानगीशिवाय परकीय निधी घेऊ शकत नाही. माझा विश्वास आहे की, राजीव गांधी फाउंडेशन हा कॉंग्रेसचा विस्तार होता. चीनकडून पैसे घेण्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली का? कोणत्या अटींवर देणगी घेतली गेली आणि त्याचा उपयोग कशासाठी केला गेला, हे त्यांनी सांगितले का? जर माहिती दिली नाही तर का दिली नाही आणि जर दिली असेल तर, म्हटले का की, आम्ही हे पैसे चीनबरोबर मुक्त व्यापार करण्याच्या बदल्यात घेत आहोत?

याआधी भाजपशी संबंधित स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील चीनी उच्चायोग राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ) साठी दीर्घ काळापासून निधी देत आहे. कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी राजीव गांधी फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या मंडळाचे सदस्य आहेत. राजीव गांधी फाउंडेशनच्या वार्षिक अहवालानुसार 2005-06 मध्ये आरजीएफला चीनी दूतावासाकडून देणगी मिळाली. चिनी दूतावासला सर्वसाधारण देणगीदारांच्या यादीत ठेवले आहे.