‘नागरिकत्व’ कायद्यावरील हिंसाचारात ‘PFI’ चा हात ! SIMIच्या ‘कनेक्शन’वर कायदामंत्र्यांचं ‘मोठं’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (Citizenship Amendment Act) नंतर, यूपीच्या पश्चिम भागात होणाऱ्या हिंसाचारात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सामील असल्याचे म्हटले जात आहे. खुद्द सरकार असे सांगत आहे की वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात पीएफआयची भूमिका समोर येत आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणतात की आता केंद्रीय गृह मंत्रालय पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणार आहे की कोणती कारवाई केली जावी.

कायदामंत्री म्हणाले, ‘पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की पीएफआयचे कनेक्शन सिमी (SIMI) सोबत आहे.’ पीएफआयची स्थापना २२ नोव्हेंबर २००६ रोजी झाली. नागरिकत्व कायद्यावरून हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी या संघटनेच्या काही लोकांना अटक केली आहे. २०११ मध्ये गुप्तचर विभागाच्या अहवालात पीएफआय सिमीशी संबंधित असल्याचे समोर आले होते. मुस्लीम संस्था पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचा(PFI) बंदी घातलेल्या इस्लामिक संघटनेचा सिमीशी संबंध आहे. ही संघटना मागास व अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा दावा करत असते. परंतु या संघटना सध्या त्यांच्या कामकाजामुळे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत.

संघटना देशविरोधी कार्यात सामील आहे
गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार या संघटना देशविरोधी कार्यात सहभागी आहेत. या अहवालानुसार मागासलेल्या आणि अल्पसंख्याकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मदत देण्याच्या नावाखाली या संघटना आपल्या धोकादायक योजना राबविण्यात मग्न आहेत. सुरक्षा संस्थांची सर्वात मोठी चिंता ही आहे की या संघटनेशी संबंधित ऐंशी ते नव्वद टक्के लोक आखाती देशांशी किंवा परदेशाशी जोडलेले आहेत.

पीएफआयचे धागे सिमीला जोडलेले आहेत
गुप्तचरांच्या अहवालानुसार देशातील प्रमुख गुप्तचर यंत्रणांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या धागे सिमीसारख्या संस्थांशी जोडलेले आहेत. या अहवालात असेही लिहिले आहे की ही संघटना देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे.

पीएफआयचे उपक्रम एकेकाळी फक्त दक्षिण भारतापुरतेच मर्यादित होते. परंतु आता या संघटनेने देशाच्या इतर भागातही आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच या संस्थेने आपले मुख्यालय दिल्लीला हलविले आहे. अशा परिस्थितीत राजधानी दिल्लीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?