भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक साई दरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपसाठी आज इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वी संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं.

शास्त्री यांच्यासोबत फिल्डिंग कोच आर. श्रीधरही होते. श्रीधर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर साईबाबा मंदिर दर्शन आणि विमानाचे फोटो अपलोड केले आहेत. रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांच्या खासगी विमानाने रवी शास्त्री आणि श्रीधर यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतले आहे. साईदरबारी शास्त्री व श्रीधर यांचा दौरा गोपनीय राहिला. त्यांनी सिंघानिया यांचे आभारही मानले आहे. माध्यनांना चकवा देऊन दोघे आले व गेलेही.

You might also like