Ravi Shastri | रवी शास्त्री यांचे विराट कोहलीच्या बचावात मोठं वक्तव्य; ‘6 वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ravi Shastri | इंडियन क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यांच्या बचावात मोठं वक्तव्य केलं आहे. नुकतंच विराट कोहली याने कर्णधार पदाला रामराम केला आहे. दरम्यान कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याचा BCCI चा निर्णय होता अशी चर्चा रंगू लागली आहे. कोहलीनं मागील 5 महिन्यांत ट्वेंटी – 20, वन डे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. विराटच्या नेतृत्वाखाली इंडियन टीमला एकही ICC सामना जिंकता आला नाही. त्यामुळे याबाबत कर्णधारपदावरून हटवण्याच्या तयारीत BCCI होती. अशी चर्चा आहे. यावरून आता रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

एका मुलाखती दरम्यान बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, ”सहा वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 1 जेतेपद पटकावले. सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid), VVS लक्ष्मण (VVS Laxman) यांनी वर्ल्ड कप (World Cup) जिंकलेला नाही. याचा अर्थ ते खराब अथवा अपयशी खेळाडू आहेत, असा होत नाही. आपल्याकडे केवळ दोनच वर्ल्ड कप विजेते कर्णधार आहेत. त्यामुळे आयसीसी स्पर्धा जिंकण्यावरून कर्णधाराच्या कामगिरीचे मूल्यांकन होता कामा नये.” असं ते म्हणाले.

”विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधार पदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी 2 वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते. पुढील 2 वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, मात्र, हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोटदुखी सुरू झाली असती.” असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ravi Shastri | it took tendulkar 6 world cups before winning one ganguly dravid laxman havent won world cup doesnt mean they are bad players say ravi shastri

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा