रवी शास्त्री यांचा खुलासा ! रोहित आणि विराट यांच्यामध्ये कसलेही भांडण नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रवी शास्त्री यांची दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. मागच्या ५ वर्षांपासून रवी शास्त्री रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना ओळखतात. त्यामुळे ते या दोघांनाही अधिकारवाणीने बोलू शकतात. आता शास्त्री यांनी आपले मौन सोडले आहे.

जाणून घ्या, काय म्हणाले शास्त्री
विश्वचषकात जेव्हा भारताचा सेमी फायनल मध्ये पराभव झाला तेव्हापासून रोहित आणि विराट मध्ये काहीतरी भांडण असल्याचे सगळीकडे बोलले जात होते. या दोघांमध्ये सगळे काही व्यवस्थित नसल्याचे सगळीकडे छापले जात होते. वेस्ट इंडिज सोबतच्या सामन्यात दोघे मैदानावर खेळताना त्यांच्यामध्ये समन्वय दिसला नव्हता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या शंका आणखीनच वाढल्या होत्या.

इंस्टाग्राम वर फॉलो करणे बंद केले होते
रोहित आणि विराट यांच्यातले भांडण एवढ्या पुढे गेले होते की, त्यांनी एकमेकांना इंस्टाग्राम वरून फॉलो करणे सुद्धा बंद केले होते. या दोघांमध्ये नेमके काय झाले असेल याचा नेमका अंदाज कोणालाही येत नव्हता. मात्र आता रवी शास्त्री यांनी याबाबत आपले मौन सोडले आहे.

याबाबत खुलासा करताना शास्त्री म्हणाले की, मी मागच्या अनेक वर्षांपासून रोहित आणि विराटला ओळखतो. यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचे भांडण नाही. यांच्यामध्ये भांडण असल्याचे वृत्त केवळ निराधार आहे असे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.

 

Loading...
You might also like