Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Ravichandran Ashwin | सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. सध्या या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. हा सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

 

काय आहे विक्रम ?
अश्विन आता भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आता त्याच्या पुढे फक्त हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे दोन गोलंदाज आहेत. या क्रमवारीत अनिल कुंबळे 953 विकेट्ससह पहिल्या स्थानी तर हरभजन सिंग 707 विकेट्सह दुसऱ्या स्थानी तर रविचंद्रन अश्विन 689 विकेट्स तिसऱ्या स्थानी आहेत. तर कपिल देव 687 विकेट चौथ्या स्थानी आहेत.

 

ऑफस्पिनर आर अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये 466 विकेट्स घेतल्या आहेत,
तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 151 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
अशाप्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून 689 विकेट घेतल्या आहेत.

 

Web Title :- Ravichandran Ashwin | ind vs aus 3rd test ravichandran ashwin breaks kapil devs record most wicket taken for india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा