Ravichandran Ashwin | आर अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘तो’ विक्रम; तसेच ‘हि’ कामगिरी करणारा ठरला आशियातील पहिला क्रिकेटपटू

पोलीसनामा ऑनलाईन : Ravichandran Ashwin | सध्या नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली कसोटी मालिका सुरु आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आजच्या सामन्यात एलेक्स कॅरीला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट घेण्याची कामगिरी केली. याचबरोबर तो सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. (Ravichandran Ashwin)

अनिल कुंबळेने 93 सामन्यात 450 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तर अश्विनने 89 कसोटीत 450 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 450 बळींचा टप्पा पूर्ण करण्याची कामगिरी मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 80 सामन्यात हा टप्पा गाठला होता. या यादीत आता अश्विन दुसऱ्या स्थानी, अनिल कुंबळे तिसऱ्या, ग्लेन मॅकग्रा चौथ्या आणि शेन वॉर्न पाचव्या स्थानी आहे. (Ravichandran Ashwin)

अशी कामगिरी करणारा आशियातील पहिला खेळाडू

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट आणि 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. अश्विनने आतापर्यंत 89 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 3 हजार 43 धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा भारताच्या
फिरकी गोलंदाजसमोर निभाव लागला नाही.
भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावात गार झाला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर स्मिथने 37, एलेक्स कॅरीने 36 आणि हँडसकॉम्बने 31 धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. या सामन्यात जडेजाने 5, अश्विनने 3 तर सिराज आणि शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

Web Title :- Ravichandran Ashwin | r ashwin second who take fastest 450 wickets in test break anil kumble s record

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…