नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यासह तिघांना एक दिवस पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे धंगेकर आज पोलिसांसमोर हजर झाले. धंगेकर आणी इतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आहे असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

महापौरांच्या दालनात जलपर्णीच्या निविदेवरून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान उत्तर देण्यासाठी आलेल्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकऱणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा १५ ते १६ जणांविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अऱविंद शिंदे यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपुर्व जामीन दिला. रविंद्र धंगेकर यांनीही याप्रकरणी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू बुधवारी ऐकून घेतली. त्यानंतर गुरुवारी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. त्यामुळे धंगेकर हे आज सकाळी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी धंगेकर यांच्याकडून निंबाळकर यांच्या दिशेने भिरकवलेली चप्पल जप्त करावयाची आहे असा दावा गुरुवारी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आणि गुन्हयाच्या तपासासाठी धंगेकर यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अ‍ॅड. विपुल दुशिंग यांनी बजाव पक्षाची बाजु मांडली आहे.