Ravikant Tupkar | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्या गाडीचा अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन सहकाऱ्यांसोबत मुंबईला बैठकीसाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीचा सोमवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ अपघात झाला. तुपकर यांच्या गाडीला एका दुचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. तुपकर (Ravikant Tupkar) यांनी स्वतः या जखमींना रुग्णालयात दाखल केले. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार (दोघेही रा. येवता) अशी जखमींची नावे आहेत.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईत उपमुख्यमंत्र्यांसोबत २४ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) सोमवारी रात्री मुंबईच्या दिशेने जात होते.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी दुचाकी वेगात असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हि दुचाकी तुपकर यांच्या वाहनाला धडकली.
यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तुपकर जखमींना घेऊन औरंगाबादकडे रवाना झाले.
दरम्यान या अपघातात सुदैवाने तुपकर आणि त्यांचा चालक सुखरूप असून वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

 

Web Title : Ravikant Tupkar | swabhimani shetkari sanghatana leader ravikant tupkars car crashed 2 two wheelers seriously injured buldhana accident news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात CM, DGP यांच्याकडे तक्रार

LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता