Ravikant Tupkar | ‘…नाही, तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार’

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – जर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे (Soyabean and Cotton Farmers) प्रश्न सोडवले नाही, तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारला दिला आहे. सोयाबीन-कापसाच्या प्रश्नाबाबत रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात बैठका आणि सभा घेतल्या. त्यानंतर बुलढाण्यात मोर्चा काढला.

या मोर्चात अनेक शेतकरी, महिला, युवक रस्त्यावर उतरले, परंतु तरीही केंद्र आणि राज्य सरकार सोयाबीन – कापसाच्या प्रश्नावर अद्यापही गंभीर नाही, त्यामुळे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अशी टोकाची भूमिका घेतली आहे. ‘सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, सरकार आमचं जगणं मान्य करणार आहे का नाही, हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीन आणि कापसाला सध्या मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त तर त्याच्या उत्पादन खर्च आहे. अशी यावर्षीची परिस्थिती आहे. मात्र सरकार आमच्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रात ५० टक्के सोयाबीन तर १८ टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत. असे असताना ही सरकार त्यांच्या भावनेशी खेळात आहे.’ असा आरोप त्यांनी केला.

‘सोयाबीनला किमान 8 हजार 700 रुपये आणि कापसाला 12 हजार 700 रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड
(डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत
दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी,
सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क 30 टक्के करावे, कापसाचे आयात
शुल्क पूर्वीप्रमाणे 11 टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द
करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या अनुदानाची
रक्कम कर्जात वळती करु नये.’ आदी मागण्या त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत.

‘सदर मागण्यांबाबत 22 नोव्हेंबरपर्यत निर्णय न झाल्यास 23 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते
मुंबईकडे कूच करतील आणि 24 नोव्हेंबर रोजी सकाळी मंत्रालया शेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन
अरबी समुद्रात जलसमाधी घेतील’, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

Web Title :-  Ravikant Tupkar | thousands of farmers will take water burial in the arabian sea of mumbai farmers leader ravikant tupkar warning to government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | शिंदे – फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रात महिला भयमुक्त – चित्रा वाघ

CM Eknath Shinde | दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया