रविंद्र जडेजाचे वडील, बहीण कॉंग्रेसमध्ये तर बायको भाजपात ; जाहीर केला ‘या’ पक्षाला पाठींबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वडील आणि बहीण यांनी कॉंग्रेसमध्ये तर पत्नीने भाजपात प्रवेश केला. यानंतर रविंद्र जडेजाने आपली भूमीका स्पष्ट करत एक ट्वीट केले आहे. त्याने ट्वीट करून भाजपाला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

रविंद्र जडेजाची पत्नी रिवावा हिने महिनाभरापुर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर रविवारी जामनगरमध्ये एका कार्यक्रमात त्याचे वडील अनिरुद्ध सिंह, आणि मोठी बहिण नयबाना जडेजा यांनी कॉंग्रेसला पाठींबा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान नयबाना जडेजा ही सरकारी रुग्णालयात परिचारिका आहे. तिने महिला सशक्तीकरणासाठी काम करायचे असल्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले होते.

रविंद्र जडेजाची पत्नी रिवावाने मार्चमध्येच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रविंद्र जडेजाचे वडील आणि मोठी बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल झाली. दरम्यान या सर्व प्रकारामुळे रविंद्र जडेजाची नेमकी भूमीका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर त्याने सोमवारी आय सपोर्ट बीजेपी असे ट्विट करून भाजपाला आपला पाठींबा जाहिर केला आहे.