Ravindra Dhangekar | आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट, बापटांनी दिला ‘हा’ कानमंत्र (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिन्याभरापासून संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Pune Kasba Peth Bypoll Election Result) गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने (BJP Hemant Rasane) यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी (दि.3) खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

 

गिरीश बापट यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले, मी बापट यांच्यासोबत दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना आमच्यात कोणताही संघर्ष झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या निवडणुका होत होत्या. मात्र आज ज्या प्रकारे निवडणूक झाली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली. सत्ताधारी पक्षाने चुकीच्या पद्धतीने नियोजन करुन एक हुकुमशाहीचं राजकारण कसबा विधानसभेत केलं. तसेच पैशाचं राजकारण आणलं.

 

बापटांनी दिला कानमंत्र
गिरीश बापट यांनी कधी पैशांचे वाटप केलं नाही. त्यांनी प्रेमाने सर्वसमावेशक राजकारण केलं. त्यामुळे त्यांच्या पारड्यात मतदारांनी मतं टाकली. आज मी त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यानी माझे अभिनंदन केले. ते म्हणाले चांगली मेहनत घेतली, कष्ट घेतले त्यामुळे त्याचे फळ मिळाले आहे. कामाचं नियोजन करुन नियोजना प्रमाणे काम कर, कामाचा पाठपुरावा कर यश निश्चित मिळेल असा कानमंत्र दिल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

 

बापटांनी कुरघोडीचं राजकारण केलं नाही
एवढचं नाहीतर अडचण आल्यासराखं वाटेल आणि माझी गरज आहे, मला सांग मी पूर्णपणे मदत करेन, असे आश्वासन दिल्याचे धंगेकर यांनी सांगितले. बापट यांनी पक्ष विरहित राजकारण करत असताना त्यांनी कुरघोडीचे राजकारण कधीच केलं नाही, माणसं संपवण्याचं काम नाही केलं. त्यांनी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना देखील ताकद दिल्याचे आपण पाहिले असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

 

मला त्यांना अडचणीत आणायचं नव्हतं
निवडणुकीपूर्वी गिरीश बापटांची भेट घेतली होती त्यावेळी कोणत्या टिप्स दिल्या असा प्रश्न रवींद्र धंगेकर यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना त्यांनी सांगितले, मी निवडणुकीपूर्वी त्यांची भेट घेतली नाही.
निवडणुकीची एवढी मोठी यंत्रणा सुरु असताना मी त्यांची भेट घेतली असती तर भाजपच्या लोकांनी त्यांच्यावर संशय घेतला असता.
त्यांना अडचणीत आणून मला माझे राजकारण करायचे नाही.
म्हणून मी ठरवलं होतं की विजयी झाल्यानंतर त्यांची भेट घ्यायला जायचं.
त्यांचेही राजकारण भाजपमधून झाले आहे. याकाळात त्यांच्यावर कोणी संशय घेऊन त्यांना दु:ख देऊ नये याची काळजी मी घेतल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Ravindra Dhangekar | After becoming an MLA, Ravindra Dhangekar met Girish Bapat, Bapat gave the ‘Ha’ chant (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट