Ravindra Dhangekar | मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर…, नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth by-Election) भाजप उमेदवाराचा पराभव करुन विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप (Chinchwad MLA Ashwini Jagtap) यांनी आज शपथ घेतली.

शपथ घेताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने…’ असा उल्लेख करत धंगेकर यांनी शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी दोन्ही आमदारांना शपथ दिली.

पुण्यात मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर
झालेली पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. 28 वर्ष भाजपने (BJP) राखलेला कसबा विधानसभा
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) गेला.
कसब्यातून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या
पत्नी अश्विनी जगताप भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत.
आज दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) शपथ दिल्यानंतर हे
दोन्ही आमदार अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

Web Title : Ravindra Dhangekar | kasba mla ravindra dhangekar oath program mother name after his name

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satish Kaushik | ‘एमर्जन्सी’ ठरला सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट; चित्रपटात त्यांनी ‘या’ राजकीय नेत्याची साकारली भूमिका

Nagpur Crime News | चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या

Pune Crime News | नशा करण्यासाठी घरफोडी करणारे दोघे जेरबंद; चोरीचा अजब फंडा, 8 मोबाईलसह पावणेदोन लाखांचा माल जप्त