Ravindra Dhangekar | शपथविधीपूर्वी रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना नमस्कार, ‘हु इज धंगेकर’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth by-Election) महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवला. कसब्याची जागा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी 28 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. आमदार म्हणून निवडून आलेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा आज शपथविधी पार पडला. शपथविधी पूर्वी त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शपथविधी पूर्वी ‘हू इज धंगेकर’ म्हणणाऱ्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. यावेळी ‘हू इज धंगेकर’ अशा घोषणा देण्यात आल्या.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान मारलेला ‘हू इज धंगेकर’ डायलॉग फेमस झाला होता. या डायलॉग वरून काँग्रेसने (Congress) चंद्रकांत पाटलांना ट्रोल केले होते. ‘धंगेकर इज नाऊ एमएलए’ असे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यानंतर धंगेकर यांनी निवडून आल्यानंतर ‘मी रवींद्र धंगेकर’ असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज विधानसभेत शपथविधी पूर्वी त्यांनी चंद्रकांत पाटलांना नमस्कार केल्याने ‘हू इज धंगेकर’च्या घोषणांनी सभागृह दणाणले.

दरम्यान, चिंचवडच्या विजयी झालेल्या आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांचे
अभिनंदन करण्यासाठी चंद्रकांत पाटील गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘हू इज धंगेकर’ विचारल्यावर
त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. कसब्याची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर
कोल्हापूरमध्ये होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र, या होर्डिंगवर ‘धीस इज धंगेकर’ म्हणत चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली होती.

Web Title : Ravindra Dhangekar | MLA ravindra dhangekar salutation to chandrakant dada before the oath ceremony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप

Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज