पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून (Kasba Peth Assembly Election 2024) पुन्हा एकदा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे.
“आमदार रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्यांसाठी झगडणारे नेतृत्व आहे. असा लढणारा नेता राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे या लढणाऱ्या नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे,” असे आवाहन ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्याम मानकर (Shyam Mankar) यांनी केले.
पानमळ्यातील शिवप्रसाद सोसायटीच्या हॉलमध्ये प्रभाग २९ आणि ३० मध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या दिवाळी फराळ व विजयी निर्धार मेळाव्यात मानकर बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ही निवडणूक संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे.
धंगेकर म्हणाले, “कसब्यातील मतदारांनी पोटनिवडणुकीत मला बळ दिले. पुढील पाच वर्षांच्या काळातही मतदार आणि कार्यकर्त्यांना अभिमान वाटेल असेच काम आपण करून दाखवू.”
या कार्यक्रमास अंकुश काकडे, गणेश नलवडे, नितीन कदम, राहुल तुपेरे, किरण गायकवाड, अभिजित बारवकर, सूरज लोखंडे, शंकर थोरवे, डॉ. मदन कोठुळे, राजू नाणेकर, प्रसाद काकडे, सूरज सोनवणे, राजेश पाथरकर, गणेश ठोंबरे, स्वाती शिंदे, अनिता धिमधिमे उपस्थित होते.