Ravindra Dhangekar On Pune Drugs Case | ‘ड्रग्स प्रकरणात पोलीस मास्टरमाईंड पर्यंत पोहोचणार नाहीत कारण…’; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Pune Drugs Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर (Kalyani Nagar Car Accident Pune) आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक होत अनधिकृत पब , बार वर कारवाई करण्याबाबत इशारा दिला होता. तसेच पोलीस (Pune Police) आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department Pune) हप्ते घेत असल्याचाही आरोप केला होता. दरम्यान पोलिसांनी त्यावेळी कारवाई करत असल्याचे दाखवले मात्र पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती शहरात पाहायला मिळाली.

पुण्यातील एफसी रस्त्यावरील (FC Road Pune) लिक्विड, लेजर, लाऊंज (L3 – Liquid Leisure Lounge) या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station Pune) दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते . तर आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, ” पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आत्ता पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे. पण याचा मास्टर माईंड कोण आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या ड्रग्जमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण असल्यानं पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत. या ड्रग्ज प्रकरणाला मंत्री शंभूराजे देसाई हे जबाबदार आहेत,” असा आरोप यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड, तोडफोड करताना बनवले रिल्स (Video)

Adani Group | अदानी ग्रुपच्या नावावर होणार सिमेंट इंडस्ट्रीचा मुकुट! नंबर-1 बनण्यासाठी काय आहे कंपनीचा प्‍लान?

Loni Kalbhor Pune Crime News | लोणी काळभोरमध्ये वाहनांची तोडफोड, दहशत परसवणाऱ्या टोळक्यांवर FIR