Ravindra Dhangekar – Pune Lok Sabha | पुण्याला सुखी शहर बनवूया – रवींद्र धंगेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar – Pune Lok Sabha | गेल्या १० वर्षात पुण्याचे भाजपचे खासदार भाजपचे ६ आमदार व भाजपचे १०० नगरसेवक यांनी पुण्याचे नागरी प्रश्न सोडवत विकास केला असता तर पुण्यातील नागरी समस्या बिकट बनल्या नसत्या. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदान करून आपल्या पुण्याला ‘सुखी शहर’ बनवूया असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी केले. पर्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या सांगते वेळी ते बोलत होते.(Ravindra Dhangekar – Pune Lok Sabha)

या पदयात्रेचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी धंगेकरांचे औक्षण केले जात होते तसेच पदायत्रेत सर्वांना पाणी दिले जात होते. अनेक सर्वाजीनिक मंडळांनी देखील धंगेकरांचे सत्कार केले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते तीनही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते.

या पदयात्रेचा प्रारंभ मुकुंदनगर येथिल कचेरीचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला.या पदयात्रेत
रवींद्र धंगेकर यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अविनाश बागवे,
माजी नगरसेविका स्नेहल पाडळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे,मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,
सतीश पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, बाळासाहेब अटळ,
महिला अध्यक्षा वाणीताई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिक्षण मंडळाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर,
विभाग अध्यक्ष सुरज लोखंडे, संपर्क प्रमुख बाळासाहेब ओसवाल, युवा प्रमुख अमोल रासकर,
वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य द. स. पोळेकर, मागासवर्गीय माजी अध्यक्ष शीला रतनगिरी, आबनावे, आशुतोष शिंदे,
भरत सुराणा, चंदू माने, अनुसया गायकवाड, शर्वरी गोतरणे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि
आम आदमी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या जीप / पदयात्रेची सुरुवात मुंकूद नगर येथील निवडणुक कचेरीचे उद्घाटन करून – डायस प्लॉट – औद्योगिक वसाहत – महर्षीनगर – आदिनाथ सोसायटी – सातारा रोड – मार्केट यार्ड – आगरवाल डेअरी – सॅलसबरी पार्क – हाईट पार्क सोसायटी – गंगाधाम चौक येथे ही जीप/पदयात्रा समाप्त झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र