Ravindra Dhangekar | एकनाथ शिंदे जिथे-जिथे जाणार, तिथे भाजपचा पराभव होणार, रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर एका वृत्तवाहिनीशी  बोलताना रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे जिथे जिथे जातील तिथे, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार (Uddhav Thackeray Government) ज्या पद्धतीने पायउतार झालं, त्याचा जनतेत प्रचंड राग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जिथे जिथे जाणार तिथे भाजपाचा (BJP) पराभव होणार आहे, अशा शब्दांत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी टीकास्त्र सोडलं.

 

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) पुढे म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले (Nana Patole), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि इतर नेत्यांना कसबा निवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) ताकदीने काम केलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढली, ही भाजपच्या पराभवाची नांदी सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांवरच ईडीच्या (ED) धाडी पडत असल्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ती वस्तुस्थिती असून ते लपून राहिलेलं नाही. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना धाक दाखवून भाजपमध्ये घेतलं गेलं. नेते गेले म्हणून जनता थोडीत जाणार आहे. जनतेवर ईडी लावणार का? त्यांच्यावर खटला भरणार का? नेते बदलू शकतात, मतदार बदलू शकत नाहीत, असे धंगेकर यांनी सांगितले.

 

2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी कशा पद्धतीने तुमची रणनिती असेल असे विचारण्यात आले.
यावर बोलताना धंगेकर म्हणाले, पाच वर्षात महापालिका, देश आणि राज्याचा कारभार सर्वांनी पाहिला आहे.
जे स्वप्न दाखवलं होतं, ते जादूगारासारखं असून, सत्यात उतरलं नाही.
सर्वसामान्य माणसाला आपण कितीवेळा फसवू शकतो, जनता दुधखूळी नाही.

 

Web Title :- Ravindra Dhangekar | Wherever Eknath Shinde goes, BJP will be defeated, Ravindra Dhangekar’s big statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे

Nandurbar Police – International Women’s Day | जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या