×
Homeताज्या बातम्याRavindra Jadeja-Balasaheb Thackeray | गुजरात निवडणुकीचा आज पहिला टप्पा, रवींद्र जडेजाला आठवले...

Ravindra Jadeja-Balasaheb Thackeray | गुजरात निवडणुकीचा आज पहिला टप्पा, रवींद्र जडेजाला आठवले बाळासाहेब ठाकरे

गुजरात : वृत्तसंस्था – Ravindra Jadeja-Balasaheb Thackeray | गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आजपासून सुरू झाले. आज गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा असून, या टप्प्यात एकूण १८२ पैकी ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मूळ राज्य असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवाय गेली २७ वर्षे भाजपची गुजरातमध्ये एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सरकारविरोधी लाटेत भाजपची सत्ता जाणार की, पुन्हा नरेंद्र मोदींची जादू गुजरातमध्ये चालणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाला मतदानाच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली आहे. रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ टाकत मतदारांना “गुजराती लोकांनो अजूनही वेळ आहे, समजून घ्या”, असे आवाहन केले आहे. (Ravindra Jadeja-Balasaheb Thackeray)

 

 

बाळासाहेब ठाकरेंच्या या व्हिडिओमध्ये ठाकरे नरेंद्र मोदींचे गुजरातसाठीचे महत्व विषद करत आहेत. बाळासाहेब या व्हिडिओमध्ये म्हणतात, “माझं हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजूला केलंत तर तुमचं गुजरात गेलं. हेच मी अडवानींजवळ बोललो आहे”. हा व्हिडीओ टाकून रवींद्र जडेजा गुजरातच्या मतदारांना नरेंद्र मोदींना म्हणजेच पर्यायाने भाजपला मत देण्याची मागणी करत आहेत. (Ravindra Jadeja-Balasaheb Thackeray)

 

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत.
रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. रवींद्र जडेजा त्याच्या बायकोच्या मैदानात उतरला होता.
विशेष म्हणजे जडेजाच्या बहिणीनेही याच मतदारसंघातून काँग्रेसकडून फॉर्म भरला आहे.
त्यामुळे रवींद्र जडेजाच्या घरातील दोन स्त्रिया एकमेकांविरोधात उभ्या आहेत.

 

Web Title :- Ravindra Jadeja-Balasaheb Thackeray | cricketer ravindra jadeja shared old video of shiv sena chief balasaheb thackeray commenting on narendra modi and gujarat before gujarat election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश

Must Read
Related News