रवींद्र जडेजा T-20 मालिकेतून बाहेर, मराठमोळ्या क्रिकेटपटूला मिळणार संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० चे उर्वरित दोन सामने तो खेळू शकणार नाही. परिणामी, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता त्याच्या जागी मराळमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूर याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय संघाला जडेजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यांत १६१ धावांपर्यंत यश काबीज करता आलं. शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही जडेजाने जबरदस्त खेळी केली. रवींद्र जडेजानं जबरदस्त खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. कॅनबेरावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात रवींद्र जडेजाच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाला संघाबाहेर बसावं लागलं होतं. जडेजाच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं केलं. कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी परतवलं. यानंतर बदली खेळाडूच्या मुद्द्यावरुन वाद देखील सुरु झाला आहे. रवींद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली आहे. उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी तो खेळणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

असा असेल भारतीय टी-२० संघ
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर