रविंद्र जडेजाचे वडिल व बहिणीचा ‘या’ पक्षात प्रवेश

अहमदाबाद : वृत्तसंस्था – देशभरात सध्या इलेक्शन फिव्हर आहे. अनेक सेलिब्रेटींनी राजकारणात प्रवेश केला आहे. असे असताना आता क्रिकेटर रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा व वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाप्रसंगी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, काँग्रेसचे आमदार विक्रम माडम उपस्थित होते. यापूर्वी रवींद्रच्या पत्नी रिवाबा जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोण आहेत नयनाबा जडेजा
रविंद्र जडेजाच्या यशात त्याची बहिण नयनाबाचा मोठा हात आहे. रविंद्रच्या आईचे निधन झाल्यानंतर नयनाबाने संपूर्ण कुटुंबाला सांभाळले आहे. जडेजाची बायको रिवाबा जडेजाने मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिवाबाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी जामनगरमध्ये काँग्रेसचे उमेदवार मुलु कांदोरिया यांच्या प्रचारासाठी जडेजाचे वडिल व बहिण देखील गेले होते. त्यामुळे आता जर भाजपने जामनगरमधून रिवाबाला तिकीट दिले तर रिवाबाच्या उमेदवारीला सर्वप्रथम घरातूनच विरोध होईल असे बोलले जाते.