शिवसेनेच्या रविंद्र वायकरांची विजयी ‘घोडदौड’ कायम, काँग्रेसच्या सुनील कुमरेंना ‘लोळवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व मधील उमेदवार रविंद्र वायकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे रविंद्र वायकर यांच्या विरोधात काँग्रेसने सुनील कुमरे यांना उमेदवारी दिली होती. परंतू रविंद्र वायकर यांना काँग्रेस आणि इतर अपक्षांना सुरुवातीपासूनच मागे पाडले. रविंद्र वायकर आणि सुनील कुमरे यांच्यात 50 हजार मतांच्या आसपास फरक राहिला. सुरुवातीपासून रविंद्र वायकर यांनी आघाडी कायम ठेवली होती. अखेर रविंद्र वायकर यांनी 58,787 मतांनी विजय मिळवला.

रविंद्र वायकर यांच्यासाठी ही निवडणूक जवळपास एकहाती ठरली. दुपारी 2 च्या सुमारास रविंद्र वायकर यांना 78095 मते होती तर सुनील कुमरे यांना 23 हजार 500 मते होती. त्यामुळे रविंद्र वायकर यांच्या विजयाचे संकेत स्पष्ट झाले होते. विजयानंतर रविंद्र वायकर दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडणूक येतील. यंदा विधानसभेला जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघात 52.88 टक्के मतदान झाले होते

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी 72 हजार 767 मतांनी विजय मिळवला. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उज्वला मोडक होते. त्यांना 43 हजार 805 मते मिळाली आणि त्यांचा 28 हजार 962 मतांनी पराभव झाला. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे राजेश शर्मा, चौथ्या स्थानावर मनसेचे भालचंद्र आंबुरे आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर तावडे होते.

1. रविंद्र दत्ताराम वायकर (शिवसेना) – 90654 मते (विजयी उमेदवार)
2. सुनिल बिसन कुमरे (राष्ट्रवादी) – 31867 मते
3. कुंदन हिंदुराव वाघमारे (बहुजन समाज पार्टी) – 1250 मते
4. दिलबाग सिंह (वंचित बहुजन आघाडी) – 5075 मते
5. विठ्ठल गोविंद लाड (आम आदमी पार्टी) – 3857 मते
6. अनिल लक्ष्मण चव्हाण (अपक्ष) – 927 मते
7. मिलींद जगन्नाथ भोळे (अपक्ष) 3304 मते
8. NOTA – 12031 मते

Visit : Policenama.com