Raviraj Taware Firing case | रविराज तावरे गोळीबार प्रकरणात पुन्हा माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरेंना अटक होणार

बारामती न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  माळेगाव येथील रविराज तावर गोळीबार प्रकरणात (Raviraj Taware Firing case) मोक्कामध्ये जामीन मिळालेले माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे (Jaideep Taware) यांना धक्का बसला आहे. रविराज तावरे गोळीबार प्रकरणात (Raviraj Taware Firing case) पोलिसांनी जयदीप तावरे यांचा सहभाग नसल्याचा अहवाल पोलिसांनी मोक्का न्यायालयात (MCOCA Court) सादर केला होता. मात्र, मोक्का न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून लावला असून जयदीप तावरे यांना 18 ऑगस्टपर्यंत शरणागती (Surrender) पत्करण्याचा आदेश दिला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर (Sub Divisional Police Officer Narayan Shirgaonkar) यांनी सांगितले, मोक्का न्यायालयात आम्ही तपासाअंती सादर केलेला अहवाल
नाकारण्यात आला आहे. जयदीप यांना 18 ऑगस्ट पर्यंत शरण येण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने दिले आहेत.

15 दिवसात आरोपींवर मोक्का कारवाई

31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर माळेगावमध्ये गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka)
करण्यात आली. रविराज तावरे यांनी रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन याप्रकरणी पोलिसांनी माळेगावचे माजी सरपंच (Former Sarpanch of Malegaon) जयदीप तावरे यांच्यावर कटात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली.
याप्रकरणी जयदीप तावरे याच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर माळेगाव मधील राजकीय वातावरण चिघळले होते.

 

जयदीप तावरेंची जामिनावर सुटका

जयदीप तावरे यांच्यावर कारवाई केल्यानंतर माळेगावकरांनी तावरे यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली होती.
रविराज तावरे यांनी राजकीय हेतूने जयदीप यांना गोवल्याचा आरोप करत पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.
पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा चौकशी करुन जयदीप यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिवरकर यांनी मोक्का न्यायालयात सादर केला.
या अहवालावरुन जयदीप तावरे यांना जुलै अखेर जामीन मंजूर झाला होता.
मात्र, आता मोक्का न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला अहवाल फेटाळून लावला आहे.

 

Web Title : Raviraj Taware Firing case | former baramati sarpanch jaydeep taware raviraj taware will be arrested again shooting case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Honey Trap Racket Pune | हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत, कोंढवा पोलिसांकडून तरूणीसह 6 जणांना अटक

Pune Crime | PM आवास योजनेतील व्हीआयपी कोठ्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

MLA Devendra Bhuyar | तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या आमदारास 3 महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड