भारताला मिळाली अमेरिकेसह ‘या’ 4 मोठ्या देशांची ‘साथ’, चीनमधून भारतात आल्या Apple च्या 8 कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    चीन आणि भारतामध्ये वाद सुरू असतानाच जगातील अनेक मोठे देश म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी सुद्धा भारताच्या सोबत उभे राहिले आहेत. दक्षिण आशियामध्ये भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब बनत आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरूवारी सांगितले की, अ‍ॅप्पलच्या आठ कंपन्या चीन सोडून भारतात आल्या आहेत. भारत उत्पादनाचे हब बनत आहे.

प्रसाद यांनी बिहारच्या एनआरएशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेदरम्यान सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलियाने समर्थन दिले आहे. भारत मोठे निर्मिती केंद्र म्हणून उदयास येत आहे आणि ग्लोबल मॅन्युफॅक्चरर इकोसिस्टमला असे वाटत आहे की, हे चीनशिवाय अन्य ठिकाणी सुद्धा असावे. मला महिती मिळाली आहे की, अ‍ॅप्पलने आपल्या जवळपास 8 कंपन्या चीनमधून भारतात स्थलांतरित केल्या आहेत.

भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला

दरम्यान, पूर्व लडाखमधील पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावरील भारतीय परिसरावर चीनद्वारे 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टला करण्यात आलेल्या अयशस्वी प्रयत्नानंतर पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. भारताने पँगोंग सरोवराच्या दक्षिणेत अनेक उंच ठिकाणी हालचाल वाढवली आहे. चीनच्या घुसखोरीची शक्यता असल्याने अतिरिक्त जवानांना पाठवण्यात आले आहे आणि संवेदनशील भागात शस्त्र तैनात करण्यात आली आहेत.

उल्लेखनीय म्हणते, 15 जूनला दोन्ही देशांमध्ये खुप तणाव वाढला होता आणि भारत व चीनी सैनिकांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. यामध्ये भारतीय लष्कराचे तब्बल 20 जवान शहीद झाले होते. चीनकडून या संघर्षात जवान मारले गेल्याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचा दावा अमेरिकेन गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे.