Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Raviwar Peth Pune Fire | आज पहाटे 5 वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात 688 रविवार पेठ, भोरी आळी, रामसुख चेंबर्स येथे आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण 4 फायरगाड्या व 1 वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता.(Raviwar Peth Pune Fire)

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका इमारतीत तळमजल्यावर दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच कुञिम श्वसन उपकरण (बी ए सेट) परिधान करत प्रथम सदर इमारतीत किंवा दुकानामध्ये कोणी अडकले आहे का याची खाञी करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा (ग्रॉसरी) साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असून आग इतरञ पसरु नये याची दक्षता घेत जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत मोठा धोका दुर केला. धुराचे प्रमाण मोठे असल्याने दलाकडून एक्झॉस्ट ब्लोअरच (धूर बाहेर काढण्याचे यंञ) वापर करुन आजुबाजूला असणारया रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. घटनास्थळी आगीचे नेमके कारण समजले नसून सदर ठिकाणी सुदैवाने जखमी नाही. सदर व्यावसायिक इमारत ही तळमजला अधिक चार मजले असून या संपुर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. सदर आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.

अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत