Ravrambha | ‘रावरंभा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजरांची भूमिका
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ravrambha | सध्या मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासकालीन चित्रपटांवर भर दिला जात आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये फत्तेशिकस्त, फर्जंद, हर हर महादेव, पावनखिंड यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यानंतर आता ‘रावरंभा’ (Ravrambha) हा प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटात शिवा ही नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेते अशोक समर्थ ‘रावरंभा’ या चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडतोजी गुजर यांच्या कामगिरीच्या जोरावर त्यांना प्रतापराव हा किताब दिला होता. या चित्रपटातून त्यांच्या पराक्रमाचा इतिहास उलघडणार आहेत. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार यांच्या प्रॉडक्शनअंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे.
‘रावरंभा’ (Ravrambha) या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते.
या पोस्टरमध्ये सरसेनापतींच्या गौरवार्थ ‘निधडय़ा छातीवरती हे, शिवतेज तळपते,
गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते’ अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे.
या यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसत असून
ते शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत. या चित्रपटात अजून कोणकोणते कलाकार असणार आहेत याचा खुलासा अजून
करण्यात आलेला नाही. या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागून राहिली आहे.
Web Title :- Ravrambha | ashok samarth will play chief senapati prataprao gujjar movie ravarambha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना