Ravrambha | ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ! ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : Ravrambha | मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांवर जास्त जोर दिल्याचे पाहण्यात येत आहे. ‘शिवप्रताप गरुड झेप’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटानंतर आता अजून एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘रावरंभा’ आत्ता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, तर प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील अभिनेता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. (Ravrambha)

रावरंभा हा चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे, तर नुकताच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र, अद्यापतरी रावरंभा कथा काय आहे? कोण कोण कलाकार आहेत? हे मात्र समोर आले नाही. एवढे मात्र नक्की की हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. (Ravrambha)

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यावर म्हटले की, “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते” अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे, तर या पोस्टरमध्ये प्रतापराव गुजर यांना चारही बाजूंनी शत्रूने घेरलेले आहे आणि ते शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.

झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत नुकतेच अशोक समर्थ हे झळकले होते.
त्यांनी त्यांच्या खलनायकी भूमिकेच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती,
तर याआधी प्रेक्षकांनी त्यांना पोलिसांच्या भूमिकेतदेखील पाहिले होते,
तर आता एक वेगळ्याच ऐतिहासिक भूमिका अशोक समर्थ हे पहिल्यांदाच साकारणार आहेत.
त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाल्याचे दिसत आहेत,
तर लवकरच या चित्रपटातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून रावरंभा हा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट आहे.
या चित्रपटाची कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :- Ravrambha | tu tevha tashi fame actor ashok samarth new historical movie ravrambha poster release

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Health Department | कोरोना काळातील कंत्राटी 597 परिचारिकांसाठी खूश खबर; महाराष्ट्र सरकार करणार कायमस्वरूपी सेवेत रुजू

Pune Police | सर, हम कामकाज देखें क्या? पुण्यातील नवनियुक्त उपायुक्त म्हणाले – ‘दुबारा इधर मत दिखना, छोडूंगा नही’, जाणून घ्या प्रकरण

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश