home page top 1

काही तरी भलतंच ! प्लेटमधला चिकन ‘पीस’ चालायला लागला ‘तेव्हा’ (व्हिडीओ)

फ्लोरिडा : वृत्तसंस्था – जेवायला बसल्यानंतर तुमच्या आवडीच्या खाद्यपदार्थामधील एखाद्या तुकड्याने ताटातून उडी मारून चालायला सुरुवात केली तर काय कराल ? विश्वास बसणार नाही पण प्लेट मधील चिकनचा तुकडा चालत असल्याची एक घटना फ्लोरीडामध्ये घडली. री फिलिप्स हिने सोशल मीडियावर टाकलेला एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामध्ये एक चिकनचा तुकडा चालताना दिसत आहे.

Whatttt Thaaaa Fuckkkkk 🤮… This was not recorded by me… all I did was repost the video TheShade Room

Geplaatst door Rie Phillips op Dinsdag 9 juli 2019

हा नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर प्रचंड प्रमाणावर चर्चा होत आहे. ७५ हजार पेक्षा अधिक कमेंट्स त्यावर आल्या असून तब्बल २ लाख ६४ हजार लोकांनी तो शेअर केला आहे. अनेक गमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडिओबाबतीत येत आहेत.

या व्हिडिओ मधील चालणाऱ्या चिकनच्या तुकड्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा तुकडा अगदी ताजा असल्याने हालचाल करत होता तर काहींच्या मते कोणीतरी तो तुकडा खाण्यासाठी चोरून नेत आहे. काही नेटिझन्स म्हणत आहेत की या तुकड्याला दोरी बांधून त्याला चालविण्यात येत आहे. काहींच्या अंदाजानुसार कोणीतरी जाणूनबुजून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार व्हायरल करून करत आहे.

एकाने तर हद्दच करत कोंबडीचे भूत हा चिकनचा तुकडा चालवत आहे अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर काही लोकांनी अशा प्रकारे चालणारे चिकन खायला देणाऱ्या हॉटेल मध्ये जाऊन जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like