RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RBI Action On Rupee Co-Operative Bank | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Rupee Co-Operative Bank) परवाना रद्द (Cancellation of License) केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलेल्या आदेशानंतर आरबीआयने (RBI) यासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा आता थेट परवानाच रद्द झाला आहे. आरबीआयचा हा आदेश आजपासून 6 आठवड्यानंतर म्हणजे 22 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल, अशी माहिती समोर आली आहे. (RBI Action On Rupee Co-Operative Bank)

आरबीआयच्या आदेशानंतर बँकेच्या वरिष्ठांना, सहकार आयुक्त, सहकारी संस्थांचे निबंधक यांना बँक बंद (Bank Closed) करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच त्यासाठी लिक्विडेटर (Liquidator) नेमण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

परवाना रद्द करण्याचे कारण काय?
– आरबीआयने जाहीर केल्यानुसार रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच कमाईचं योग्य साधन नाही किंवा कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे ते बँकिंग नियमन कायदा 1949 (Banking Regulation Act) च्या कलम 56 सह कलम 11(1) आणि कलम 22 (3) (d) च्या तरतुदींचे पालन झालेलं नाही, असं स्पष्ट होतं.

– बँक कलम 22(3)(a), 22 (3) (b), 22(3)(c), 22(3) (d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे.

– बँक चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या हितासाठी चांगलं नाही.

– सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक ठेवीदारांना पैसे देऊ शकणार नाही, हे वास्तव आहे.

 

Web Title :- RBI Action On Rupee Co-Operative Bank | rbi cancels licence of rupee co operative bank ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

 

NCP Chief Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

 

MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे