RBI चा आदेश ! ५० पैशापासुन १० रूपये पर्यंतची सर्व नाणी ‘व्हॅलिड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. १० रुपये आणि ५० पैसे यांच्याबाबत बाजारात जो गैरसमज पसरला आहे किंवा ती नाणी घेण्यासाठी दिला जाणारा नकार यावर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत रिजर्व बँकेने सर्व बँकांना १० रुपये आणि ५० पैश्याची नाणी स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. हि नाणी स्वीकारण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही. त्यामुळे आता सर्व बँकांना हि नाणी स्वीकारावी लागणार आहेत.

हि नाणी आहेत सध्या चलनात

सध्या बाजारात ५० पैसे, १ रुपये, २ रुपये, ५ रुपये आणि १० रुपये इतकी नाणी सध्या वापरात आहेत. त्याचबरोबर फाटक्या नोटा आणि नाणी बदलून देण्याविषयीच्या देखील सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. मात्र तरीदेखील काही बँक ग्राहकांना त्या नोटा बदलून देत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करत असतात.

वेळोवेळी नाणी बदलतात

यावेळी नाण्यांवर स्पष्टीकरण देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले कि, बाजारातील व्यवहार पूर्ण करण्यासाठी आरबीआय काही विशेष नाणी बाजारात आणत असते. काही नाणी कमी अवधीसाठी तयार केली जातात तर काही जास्त कालावधीसाठी बनवली जातात. काही नाणी दीर्घकाळ टिकण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची बनवली जातात. त्यामुळे बँकांनी नाणी स्वीकारण्यास नकार देऊ नये.

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

नियमित भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही, कारण…

‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या