Homeताज्या बातम्याRBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे...

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Alert | नोटबंदीपासून लोक नव्या-जुन्या नोटांबाबत खुप सतर्क आहेत. विशेषता 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत दररोज बातम्या येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता 500 रुपयांच्या नोटेबाबत (500 Rupees Note) एक व्हिडिओ वायरल होत आहे. जर तुमच्याकडे सुद्धा अशाप्रकारची 500 रुपयांची नोट असेल तर ही बातमी तुमच्या कामाची असू शकते. (RBI Alert)

 

कारण सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेसंबंधी एक व्हिडिओ समोर येत आहे ज्यामध्ये सांगितले आहे की, जर तुमच्याकडे सुद्धा अशी 500 रुपयांची नोट असेल तर सावध व्हा, ही नोट फेक आहे.

 

या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या नोटेची माहिती दिली जात आहे आणि त्यामध्ये सत्यता आहे का, ते जाणून घेवूयात…

 

सोशल मीडियावर वायरल होत आहे हा व्हिडिओ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक सांगत खरी आणि बनावट नोटेची ओळख सांगितली जात आहे. या व्हिडिओमध्ये नोटेतील हिरव्सा पट्टीच्या जागेबाबत सतर्क करण्यात आले आहे. (RBI Alert)

 

कोणती नोट बनावट असल्याचे सांगितले जातेय
जर 500 रुपयांच्या नोटेत हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसेल आणि ती गांधीजींच्या छायाचित्राजवळ असेल तर ही नोट फेक आहे. रू. 500 ची अशी कोणतीही नोट घेऊ नये.

 

पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले सत्य
पीआयबीने या व्हिडिओबाबत ट्विट करत लिहिले आहे की, दिलेली माहिती चुकीची आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहे.

 

तुम्ही सुद्धा करू शकता फॅक्टचेक
जर तुम्हाला असा मेसेज मिळाला तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअप नंबर +918799711259 किंवा ईमेल : [email protected] वर पाठवू शकता. ही माहिती पीआयबीच्या वेबसाइट https://pib.gov.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

 

Web Title :- RBI Alert | this green strip 500 rupees note is fake rbi issues alert check

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News