सावधान ! ‘हे’ वाहतूकीचे नवीन 19 नियम, ‘त्या’ ८ रूल्सचं उल्लंघन केल्यास पोलिसांकडून थेट लायसन्स रद्द, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटर वाहन (संशोधन) विधेयक २०१९ ला या महिन्याचा सुरुवातीला मंजुरी दिली होती. यात आता वाहन परवाना देण्यासंबंधित नियमांना अधिक कठोर करण्यात आले आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर पोलिसांना ८ महत्वाचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आता वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर या अधिकारांनुसार कठोर कारवाई करणार आहेत. शिवाय नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रक्कमेत देखील वाढ करण्यात आली आहे. संसदेत या आठवड्याच्या सुरुवातीला या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती.

एका अधिकृत अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की या विधेयकाला ऑगस्ट २०१९ ला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे, त्यामुळे आता वाहनांचे नियम आता अधिक कठोर होणार आहेत. या विधेयकात तरतूद आहे की अल्पवयीन असलेल्यांनी वाहन चालवले आणि अपघात झाल्यास त्यांच्या पालकांना ३ वर्षांचा तुरुंगवास होईल. तसेच रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल आणि दंड देखील ठोठवण्यात येईल.

वाहन परवाना नसल्यास वाहन चालवल्यास एग्रीगेटर्सला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. वेगाने वाहन चालवल्यास वाहन चालकाला १००० ते २००० रुपये दंड भरावा लागले.

मोटर वाहन (संशोधन) विधेयक २०१९ मधील हे आहेत नवे कायदे –

१) कलम १७८अंतर्गत विना तिकिट प्रवास केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल.

२) कलम १७९ नुसार ऑथाॅरिटीजच्या आदेशाचे उलंघ्घन केल्यास २००० रुपये दंड भरावा लागेल.

३) कलम १८१ नुसार विना परवाना वाहन चालवल्यास ५००० रुपये दंड ठोठावण्यात येईल.

४) कलम १८२ नुसार पात्र नसताना वाहन चालवल्यास १०००० रुपये दंड भरावा लागेल.

५) कलम १८३ नुसार वेगाने वाहन चालवल्यास १००० रुपये दंड भरावा लागेल.

६) कलम १८४ नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल.

७) कलम १८५ नुसार दारु पिऊन वाहन चालवल्यास १०००० रुपये दंड ठोठावण्यात येईल.

८) कलम १८९ नुसार स्पीडिंग रेसिंगवर ५००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

९) कलम १९२ A नुसार विना परवाना वाहन चालवल्यास १०००० रुपये दंड भरावा लागेल.

१०) कलम १९३ नुसार वाहन परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड सोसावा लागेल.

११) कलम १९४ नुसार ओवरलोडिंगमुळे २००० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

१२) कलम १९४ A नुसार ओवरलोडिंग पेसेंजर १००० रुपये दंड असेल.

१३) कलम १९४ B नुसार सीट बेल्ड नसल्यास १००० रुपये दंड भरावा लागेल.

१४) कलम १९४ C नुसार दुचाकीवर ओवर लोडिंगवर म्हणजेच ट्रिप्सीवर २००० रुपये दंड आणि ३ महिना वाहन परवाना रद्द करण्यात येईल.

१५)  कलन १९४ D नुसार विना हेल्मेट आढळल्यास १००० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्यात येईल.

१६)  कलम १९४ E नुसार रुग्णावाहिकांसारख्या आप्तकालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १०००० रुपये दंड भरावा लागेल.

१७) कलम १९६ अंतर्गत विना वीमा असलेले वाहन चालवल्यास २००० रुपये दंड सोसावा लागेल.

१८) कलम १९९ नुसार अल्पवयीन वाहन चालवल्यास त्यांच्या पालकांना दोषी ठरवण्यात येईल. त्यांना 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. तसेच अल्पवयीन वाहन चालकांवर जुवेलाइन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय वाहनाचे रजिस्ट्रेशन देखील रद्द करण्यात येईल.

१९) अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारांमध्ये कलम १८३, १८४, १८५, १८९, १९०, १९४C, १९४D, १९४E अंतर्गत वाहन परवाना रद्द करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –