शेतकऱ्यांसाठी खुशखबर मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, ‘किसान क्रेडीट कार्ड’वर मोठी सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI ने मस्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये 2 टक्के व्याजाची सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे. या इंटरेस्ट सब्वेंशनबरोबर छोट्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. 2018- 2019 आणि 2019-20 मध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सब्सिडी स्कीमचा फायदा घेऊ शकतात.

या घोषणेमुळे आता मस्य पालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोस्ताहन मिळेल आणि शेतकऱ्यांना देखील अधिक फायदा होईल.

वेळेआधी कर्ज फेडल्यास 3 टक्के डिस्काऊंट –
हे कर्ज शेतकऱ्यांनी वेळेआधी फेडल्यास 3 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. या नियमानंतर वेळेत कर्ज फेडल्यास शेतकऱ्यांना 4 टक्क्यांच्या दराने व्याज भरावा लागेल.

मस्य पालन आणि पशुपालन करणाऱ्यांना मिळणार फायदा –
RBI ने सांगितले की या व्याज सब्सिडीच्या सूटीचा फायदा 2 लाख पर्यंतच्या छोट्या कालावधीच्या कर्जावर मिळेल. ही सूट फक्त मस्य पालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळेल. जे शेतकरी पहिल्यापासूनच केसीसीच्या आधारे पीक कर्ज घेतले आहेत त्यांना देखील मस्य पालन आणि पशुपालन सारख्या कामांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

पीक कर्ज आणि मस्यपालन –
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जवर योजनेचा फायदा घेता येईल. तर जे शेतकरी फक्त मस्य आणि पशुपालन करणार आहेत त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर याचा फायदा मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –