2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार ? RBI ची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई आता बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, देशाच्या चलन प्रणालीमधून लवकरच २ हजारांच्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात २ हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने (RBI) केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हळूहळू चलन प्रणालीमधून २ हजार रुपयांच्या नोटा काढण्यास सुरूवात केली आहे.

आरबीआयने मागील वर्षी देखील २ हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. हा अहवाल २६ मे २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण पेपर रोख ०. ३ टक्क्यांनी घटून २,२३,३०१ लाख युनिट्सवर पोचली. मूल्याच्या दृष्टीने मार्च २०२१ मध्ये ४.९ लाख कोटी रुपयांच्या २ हजारच्या नोट चलन प्रणालीमध्ये होत्या, तर मार्च २०२० मध्ये त्याचे मूल्य ५.४८ लाख कोटी रुपये होते. भारतात नोटाबंदी केल्यानंतर २०१६ मध्ये चलनात २ हजार रुपयांची नोट आणली होती. परंतु मोठी मूल्यवान नोट असल्याने ही बनावट चलन बाजारात जाण्याचा धोकाही जास्त आहे.

आरबीआयच्या या अहवालानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत चलनात एकूण बँक नोटांमध्ये ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८५.७ टक्के होता. तर ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत हा आकडा ८३.४ टक्के होता. यामध्येही प्रमाणानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत चलनात असलेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांचा नोटांचा हिस्सा सर्वाधिक ३१.१ टक्के होता. आरबीआयच्या अहवालानुसार, मार्च २०१८ मध्ये २००० प्रणालीत ३३६.३ कोटीच्या नोटा होत्या, परंतु ३१ मार्च २०२१ मध्ये या संख्येत घट होऊन २४५.१ कोटींवर आली आहे. म्हणजेच या तीन वर्षात ९१.२ कोटी नोटांना चलन प्रणालीवरून बाहेर काढल्या गेल्या आहेत.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय