2000 च्या नोटेसंदर्भात महत्वाची बातमी ! RBI बंद करणार ही नोट ? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी २००० च्या नोटा चलनात खूप कमी प्रमाणात वापरण्यात आल्या असून, सन २०१९-२० मध्ये २००० रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या नसल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. मार्च २०१८ च्या अखेरीस २००० च्या नोटांचे ३३,६३२ लाख पीस चलनात होते ते मार्च २०१९ च्या अखेरपर्यंत कमी होऊन ३२,९१० पीस वर आले आहेत. तर मार्च २०२० अखेरीस २००० च्या नोटांचे सर्क्युलेशन कमी होऊन २७,३९८ लाख पीसवर आले असल्याचे आरबीआयने वार्षिक अहवालात सांगितलं आहे.

सरकारचे २००० रुपयांच्या नोटांबाबत स्पष्टीकरण

अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, सध्या २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे की, कोरोना महामारीच्या काळाNota, Reserve Bank of India, RBI, Minister of State for Corporate Affairs Anurag Thakur, Reserve Bank of India, Corona, Corona, RBI, Financial Markets, Reserve Bankत भारताला विकासाच्या वाटेवर परतण्यासाठी सखोल आणि व्यापक सुधारणांची गरज आहे. देशाचा संभाव्य विकास दर खाली येण्याचा इशारा केंद्रीय बँकेने दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या मुल्याकंन आणि संभाव्यतेमध्ये असे सांगितले आहे की कोरोना संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. भविष्यात कोरोना संसर्गाचा प्रसार, याचा कालावधी आणि उपचारासाठी आवश्यक लस कधी येईल यावर जागतिक अर्थव्यस्थेचा आकार अवलंबून असणार आहे.

कोरोना नंतर परिस्थितीत सखोल आणि सर्वसमावेशक सुधारणांची आवश्यकता असल्याचं, आरबीआयने सांगितलं. उत्पादनाच्या बाजारपेठेपासून आर्थिक बाजार, कायदेशीर चौकट आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा या सर्व आघाड्यांवर व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे. तरच आपण विकास दरातील घसरणीवर मात करुन अर्थव्यस्थेला आणि आर्थिक स्थिरतेसह दृढ आणि टिकाऊ विकासाच्या मार्गवर घेऊ जाऊ शकतो, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.