खुशखबर ! ‘या’ कारणामुळे 6 जूनपासून कर्ज होणार स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लागोपाठ तिसऱ्यांदा आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. या कपातीचा मोठा फायदा होणार असून कर्ज स्वस्त होणार आहे. याबाबत आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक तीन जून, चार जून आणि सहा जूनपर्यंत चालणार आहे. या बैठकीनंतर ही घोषणा केली जाऊ शकते.

सध्या रेपो रेट ६ टक्क्यांवर आहे. लागोपाठ तिसऱ्यांदा आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत आहे. यापूर्वी आरबीआयने रेपोदरात ०. २५ टक्क्याची कपात केली होती.

तज्ञांच्या मते, २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर हा पाच वर्षातील निच्चांकी दर आहे. यामुळे आरबीआयच्या व्याज दरामध्ये कपात होण्याची संधी वाढली आहे.