RBI नं रद्द केलं महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचं लायसन्स ! अनेक खातेदारांचे अडकले पैसे, जाणून घ्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँके (Vasantdada Nagari Sahakari Bank) चे लायसन्स रद्द केले आहे. रिझर्व्ह बँकेनं म्हटले की, बँक आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ठेवीदारांचे संपूर्ण पैसे परत करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचे लायसन्स रद्द (License Cancelled) केले जात आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की सहकारी बँकेचे लायसन्स रद्द झाल्यावर आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाल्याबरोबरच वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल.

पाच लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित
रिझर्व्ह बँकेने म्हटले की सहकारी बँकेचे लायसन्स सोमवारी व्यवसाय संपल्यानंतर रद्द मानले जाईल. यानंतर सहकारी बँक ऑपरेट करू शकणार नाही. ठेवीदार लिक्विडेशनच्या नंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉपोर्रेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळण्यास पात्र असतील.

99% पेक्षा जास्त ठेवीदारांना मिळेल पूर्ण रक्कम
रिझर्व्ह बँकेने बँकेचा लिक्विडेटर (Liquidator) नेमण्याचे आदेश देखील दिले होते. बँकेचे म्हणणे आहे की वसंतदादा नागरी सहकारी बँक चालू ठेवणे ठेवीदारांच्या हिताचे नाही. सद्य परिस्थितीत बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देण्यास सक्षम होणार नाही. सध्या केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की लायसन्स रद्द झाल्यानंतरही 99 टक्के ठेवीदारांना त्यांचे भांडवल परत मिळेल.

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचे रद्द केले होते लायसन्स
दरम्यान आरबीआयने महाराष्ट्रातीलच कराडमधील अडचणीत आलेल्या ‘कराड जनता सहकारी बँके’चे लायसन्स देखील रद्द केले आहे. नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. आरबीआयने म्हटले आहे की लायसन्स रद्द झाल्यानंतर आता बँक पूर्णपणे बंद होईल.