RBI ने 3 नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचा परवाना केला रद्द, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन नॉन बँकिंग फायनान्सिंग (NBFC) कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे. त्याचवेळी 6 इतर NBFC ने आरबीआय समोर आले परवाने सरेंडर केले आहेत. याआधीही आरबीआयने अनेक NBFC चे परवाने व्यवसाय न केल्याने रद्द केले आहेत. यासह काही NBFC ने व्यवसाय नसल्याने त्यांचे परवाने सरेंडर केले आहेत. जाणून घेऊया कोणकोणत्या एनबीएफसीचा परवाना रद्द झाला आणि कोणी सरेंडर केले.

काय असते NBFC चे काम –

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी ( NBFC) देशाच्या बँक आणि बाजारातून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवतात. दरम्यान, एनबीएफसीचा व्याज दर बँकेपेक्षा किंचित जास्त आहे. परंतु एनबीएफसीकडून कर्ज घेण्यासाठी लोकांना जास्त कागदपत्रे गोळा करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सहज कर्ज मिळते.

कोणत्या एनबीएफसीचा परवाना रद्द –

आरबीआयने 3 नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचा (एनबीएफसी) परवाना रद्द केला. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आरबीआय अधिनियम – 1934 च्या कलम 45-I च्या कलम-ए च्या नियमांनुसार काम न केल्यामुळे या एनबीएफसीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील अभिनव हिरे परचेस, गुरुग्रामची ज्युपिटर मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि आसामच्या एनई लीजिंग अँड फायनान्सचा समावेश आहे.

कोणत्या एनबीएफसीने सरेंडर केला परवाना –

6 एनबीएफसीने स्वतः त्याचा परवाना सरेंडर केला आहे. या कंपन्याही आरबीआय कायदा – 1934 नुसार कार्य करण्यास अक्षम झाल्या आहेत. ज्यामध्ये नोएडाचे रघुकुल ट्रेडिंग, वाराणसीची दिव्या टाई-अप, नवी दिल्लीची गिरनार इन्व्हेस्टमेंट, अंधेरी (मुंबई) चॉईस इंटरनेशनल, जयपूरची देवयानी इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रेडिट आणि गुवाहाटीच्या जेके बिल्डर्स आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांनी आरबीआयकडे आत्मसमर्पण केले आहे.

कोरोना बनले मोठे कारण –

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीचा रोग आणि लॉकडाऊनमुळे देशात आर्थिक घडामोडीमुळे एनबीएफसीना काम करण्यास बरीच अडचण येत आहे. बाजारात कर्जाची मागणी नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एनबीएफसीचा व्यवसाय खूपच सुस्त होता. यामुळे आरबीआयने 3 एनबीएफसी आणि 6 एनबीएफसी यांचा परवाना रद्द केला.