RBI ने कर्जासंबंधी बदलले नियम, ‘या’ 3 क्षेत्रांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वाचा निर्णय घेतला असून एनबीएफसीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व कर्जांना आता यापुढे प्राथमिक क्षेत्रातील कर्ज मानले जाणार आहे. यामध्ये कृषी, लघु उदयॊग, त्याचबरोबर आवास योजनांना दिले जाणारे कर्ज यापुढे प्राथमिक क्षेत्रांमध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. या निर्णयाविषयी बोलताना रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले कि, या क्षेत्रातील कर्जधारकांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नवीन निर्णयानंतर आता एनबीएफसी कृषी क्षेत्रात प्रत्येक कर्जदाराला कर्ज देण्याची मर्यादा यापुढे १० लाख रुपये असणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज देण्याची हीच मर्यादा २० लाखांपर्यंत असणार आहे. आवास योजनेतील घरांना देखील यापुढे वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. या कर्जांना प्राथमिक कर्जांमध्ये मोजण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देखील अर्थसंकल्पातील आपल्या भाषणात यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात घोषणा केली.

दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून कर्ज प्रक्रिया देखील सोपी होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like