‘चलनानं नव्हे तर डिजीटल पेमेंट करा’, RBI च्या शक्तिकांत दास यांनी सांगितलं ‘कोरोना’ विरूध्दचं युध्द जिंकण्याचा ‘फॉर्म्युला’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. ही महामारी टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामाजिक अंतर आणि सरकार सतत लॉकडाऊनचे अनुसरण करण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. हे साथीचे रोग रोखण्यासाठी ते सध्या डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच, कोरोना विषाणू हा देशासाठी प्रत्येक दृष्टीने एक मोठे संकट आहे आणि बचाव हा एकच तोडगा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

व्हिडिओमध्ये शक्तीकांत दास म्हणाले की, ‘कोरोना विषाणूमुळे देश संकटात सापडला आहे, अशा परिस्थितीत लोकांनी घरी डिजिटल व्यवहार केले पाहिजेत. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे व्यवहार करा आणि सुरक्षित राहा. एक प्रकारे त्यांनी देशातील जनतेला चलन व्यवहार कमी करण्याचे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जर लोक लॉकडाऊन दरम्यान अधिक चलन व्यवहार करतील तर मग ते एकमेकांच्या संपर्कात येतील आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती असेल. अश्या वेळी, डिजिटल व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहे.

कोरोना संकटातून मुक्तता
विशेष म्हणजे कोरोना विषाणू संकटातून ग्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी आरबीआयने या आठवड्यात एक मोठी घोषणा केली आहे. शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.75 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय गृहकर्ज आणि कार कर्जाच्या ग्राहकांना दिलासा देताना 3 महिन्यांच्या ईएमआयची नंतर भरण्याचा सल्ला दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like