Advt.

RBI Commemorative Coin | 1, 2 नव्हे, 75 आणि 100 ची नाणी सुद्धा जारी करते RBI, तुम्ही अशी मिळवू शकता

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  RBI Commemorative Coin | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एखादी व्यक्ती विशेष किंवा घटना विशेषच्या सन्मानार्थ किंवा स्मरणार्थ हे नाणी (RBI Commemorative Coin) जारी करते. ही नाणी सामान्य चलनात येत नाहीत, ती केवळ स्मृती पित्यर्थ ठेवली जातात. ही नाणी वेगळ्या मूल्याची असतात. या नाण्यांमध्ये 75 रुपये, 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये, 250 रुपयांच्या नाण्याचा समावेश आहे. याशिवाय सुद्धा अनेक प्रकारची नाणी असतात.

पहिल्या स्मरणार्थ नाण्यांची सीरीज 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सन्मार्थ जारी केली होती. अशा विशेष नाण्यांचा संग्रह काही हौशी लोक करतात. आज आम्ही सामान्य चलनापेक्षा वेगळ्या मूल्याच्या या नाण्यांच्या खरेदीची पद्धत सांगणार आहोत.

विशेष प्रसंगी जारी होते स्मृती नाणे

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (International Society for Krishna Consciousness – ISKCON) चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे विशेष स्मरण नाणे जारी केले होते.

असे खरेदी करू शकता नाणे

 

तुम्हाला सुद्धा नाणे खरेदी करायचे असेल तर एसबीआयच्या टाकसाळीत त्याचे बुकिंग करू शकता. रिझर्व्ह बँकेचे मुंबई आणि कोलकाता टाकसाळ ऑफिसच अशी स्मृती नाणी जारी करते. (RBI Commemorative Coin)

याचे संचालन भारतीय सुरक्षा मुद्रण आणि चलन निर्मिती महामंडळ करते.
या नाण्यांसाठी महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल, ज्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही आरबीआयच्या साइटवर करू शकता.

आरबीआयनुसार, अजूनही बाजारात 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलानात असून ती जारी केली जातात.

ही नाणी नाकारता येणार नाहीत.

Web Titel :  RBI Commemorative Coin | rbi issues coins of rs 75 100 125 150 you can take it like this RBI Commemorative Coin

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा